औरंगाबाद- मुलींच्या समस्यांसाठी नेहमी पुढे येणार्या महिला संघटना आकांक्षा देशमुख खून प्रकरणी मूग गिळून का बसल्या आहेत? असा प्रश्न सर्वत्र उपस्थित केला जात आहे.
शहरातील एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयात फिजिओथेरपीचे शिक्षण
घेणार्या आकांक्षा देशमुख या 22 वर्षीय तरुणीचा वसतिगृहात खून झाला. चार दिवस उलटले तरीही अजून तपास
सुरुच आहे. त्यातच महिलांसाठी, युवतींसाठी नेहमी पुढाकार घेत
असल्याचा दावा करणार्या संघटना, आकांक्षा खून प्रकरण गप्प
का बसल्या आहेत? असा प्रश्न सर्वत्र उपस्थित केला जात आहे.
इतर वेळी कुठलीही घटना झाली की, महिला संघटना पुढाकार घेतात.
परंतु आकांक्षांचा वसतिगृहात एवढी सुरक्षितता असतानाही खून होतो. याची भनकही
कुणाला लागली नाही. या घटनेमुळे सर्वत्र मुलींमध्ये
भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच महिला संघटनाही गप्प बसल्या आहेत.
आकांक्षाच्या पालकांची भेट घेऊन सांत्वनही करावे, असे महिला सामाजिक संघटनांना वाटलेले नाही. कुठलीही घटना झाली तरी महिला संघटना पुढाकार घेत असताता. परंतु आकांक्षांच्या मृत्यूने सर्वत्र शहर सुन्न झाले आहे. शिवसेनेची महिला आघाडी वगळता अन्य महिला संघटना अजूनही गप्पच का बसल्या आहेत? अशी उलट-सुलट चर्चा शहरात सुरु आहे.
सुरक्षेच्या प्रश्नांंवर बोलणार कोण?
आकांक्षाच्या खुनामुळे सर्वत्र विद्यार्थ्यांनमध्ये भिती
जनक वतावरण निर्माण झाले आहे. सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. असे असताना महिला
संघटना या घटनेवर काहीच का बोलत नाही? असा प्रश्न सर्वत्र उपस्थित होताना दिसत
आहे. इतर वेळेस महिला संघटना महिलेवरी अत्याचारावर पुढाकार घेतात परंतु आकांक्षाचा
सुरक्षा असतानाही खून होतो ही बाब सगळ्यांना सुन्न करणारी असून ही आज महिला मंडळी गप्प का अशी चर्चा सर्वत्र केली जात आहे..















